कोविड-१९ वर औषध सापडल्याचा दावा

कोविड-१९ वर औषध सापडल्याचा दावा

भारतातील अनेक राज्ये कोविडच्या उद्रेकाचा सामना करत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. झायडस कॅडिला या कंपनीने कोरोनावर गुणकारी ठरलेले औषध निर्माण केल्याचा दावा केला आहे. त्याबरोबरच त्यांना आणिबाणीच्या काळात वितरणासाठी औषध मानके व नियंत्रण संस्थेकडून (डीजीसीआय) परवानगी मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले. या कंपनीचे विराफिन नावाचे औषध कोविड-१९ विरुद्ध प्रभावी ठरल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

फ्रान्स भारताच्या पाठिशी सहाय्य करण्यासाठी ठामपणे उभा

हवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी

देशवासीयांचे ‘प्राण’ वाचवायला भारतीय हवाईदल झेपावले

‘राजेश टोपे यांचे वक्तव्य असंवेदनशील’

या औषधाच्या वापरानंतर कोविड-१९ मुळे निर्माण होणारी गुंतागुंत टाळता येते. कंपनीने या औषधाच्या वितरणाची परवानगी घेताना हे औषध कोविडच्या सुरूवातीच्या काळात दिलं तर कोविडमुळे निर्माण होणारी गुंतागुंत टळते. हे औषध डॉक्टरांच्या चिट्ठीनंतरच दिले जाऊ शकेल असे सांगितले आहे.

देशातील विविध ठिकाणच्या २०-२५ केंद्रांवरून गोळा केलेल्या माहितीनुसार ज्या रुग्णांना हे औषध दिले गेले त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत गेली होती. त्याबरोबरच हे औषध दिलेल्या लोकांना ऑक्सिजन लावण्याची गरज देखील कमी पडली होती. त्यावरून हे औषध हा आजार पसरू नये यासाठी प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट हेत आहे. हे औषध इतर काही विषाणूंच्या विरुद्ध देखील प्रभावी ठरले होते.

आता या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे. या चाचणीदरम्यान ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले, त्यातल्या बहुसंख्यांची आरटीपीसीआर चाचणी ७ व्या दिवशी कोविड-१९ निगेटीव्ह आली आहे.

भारतात रुग्णवाढ झपाट्याने होत असताना ही निश्चीतच आशादायक बाब मानली जात आहे. या औषधामुळे कोविड विरूद्ध लढ्यात एक प्रभावी हत्यार उपलब्ध झाले असल्याचे वाटत आहे.

Exit mobile version