मुंबईला हुडहुडी

मुंबईला हुडहुडी

सकाळी १५.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याने गुरूवार सकाळ मुंबईची वर्षातील सर्वात थंड सकाळ ठरली आहे. उत्तरेतील गार वाऱ्यांचा प्रभाव म्हणून मुंबईच्या तापमानात घट झाली आहे.

सांताक्रुझला असलेल्या भारतीय हवामान खात्याच्या वेधशाळेने गुरूवारी सकाळी मुंबईतील किमान तापमान १५.२ अंश सेल्सियस इतके असल्याचे सांगितले. बुधवारी किमान तापमान १५.३ अंश सेल्सियस नोंदले गेले होते. गुरूवारी सकाळी झालेली नोंद ही नेहमीच्या तापमानापेक्षा २.३ अंशांनी कमी आहे. ही या ऋतूतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी नोंद ठरली आहे. गेल्या वर्षी २९ डिसेंबरला मुंबईत पारा १५ अंशांपर्यंत उतरला होता.

कुलाबा वेधशाळेत १७.६ अंश किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान १.९ अंशांनी नेहमीच्यपेक्षा कमी होते.

मुंबई आणि परिसराच्या आसपासचे तापमान घटण्याची शक्यता होती. कारण उत्तरेत आलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव मुंबईवर झाला. असे वेधशाळेचे मुख्य निर्देशक के एस होसाळीकर यांनी सांगितले.

मागच्या वर्षीपेक्षा कमान तापमानात थोडी वाढ झाली असली तरीही, ते एकंदरीत कमी राहिले आहे. सांताक्रुझ वेधशाळेने २९.९ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद केली तरीही हे तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा १.७ अंशांनी कमी राहिले आहे. कुलाबा वेधशाळेने कमाल तापमान २८.४ अंश नोंदले जे नेहमीच्या तापमानापेक्षा १.९ अंशांनी कमी आहे.

घसरलेल्या तापमानामुळे हवेच्या गुणवत्तेत मात्र घट झाली आहे.

Exit mobile version