सुप्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी सिप्लाने कोविडच्या गेल्या लाटेपासूनच रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन दुप्पट केले होते.
देशभरात सध्या कोविडचे रुग्ण मोठ्या वेगाने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने रेमडेसिवीर औषध आणि त्याच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारे घटक यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
हे ही वाचा:
आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक
मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे
संचारबंदीच्या निर्णयाचे बुमरँग उलटले?
अनिल देशमुखांची आज सीबीआय चौकशी
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या औषधाची असलेली ऐतिहासिक मागणी लक्षात घेता, आम्ही आमच्या बाजूने या औषधाचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न करत आहोत जेणेमुळे सध्याची मागणी पूर्ण करू शकू.
उत्पादन वाढवण्याबरोबरच कंपनी या औषधाच्या न्याय्य वितरणासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे समजले आहे. त्यासाठी कंपनी, आधी रुग्णालयांत औषधे पोहोचवणाऱ्या मार्गांचा वापर करणार आहे. त्यातही विशेषतः ज्या भागात कोविड-१९चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत, त्या भागात या औषधाचा पुरवठा केला जाणार आहे. असे देखील सिप्लाकडून सांगण्यात आले.
कंपनीने सांगितले सध्या कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने या औषधाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याबरोबरच कंपनीला देखील याचा तुटवडा जाणवतो आहे. त्यासाठी कंपनी त्यांच्या पुरवठादारांसोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे हे औषध उपलब्ध होईल यासाठी आवश्यक पावले कंपनी उचलत आहे.