टीव्ही जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘सीआयडी’ या प्रसिद्ध शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे.हृदयविकाराचा झटका आल्याने गेल्या काही दिवसांपासून दिनेशला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मात्र आज ५ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. अभिनेते दिनेश फडणीस ५७ वर्षांचे होते.अभिनेत्याच्या निधनाने त्याच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दिनेश फडणीस हे गेल्या काही दिवसांपासून आयसीयूमध्ये जीवन-मरणाची झुंज देत होते. मात्र, आज त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिनेशच्या मृत्यूची पुष्टी त्याचा जवळचा मित्र आणि सीआयडी शोमधील सहकलाकार दयानंद शेट्टी यांनी केली आहे. दयानंद शेट्टी दिनेश यांच्या खूप जवळचे होते. अभिनेत्याच्या जाण्याने त्यांनाही दु:ख झाले आहे.
हे ही वाचा:
शार्कने घेतला महिलेच्या पायाचा घास; पाच वर्षांच्या मुलीसमोर मातेचा मृत्यू!
राजकीय मैदानात अझरुद्दीन त्रिफळाचीत
तीन राज्यांमधील खासदार खासदारकी सोडणार?
इस्रोला मोठं यश; चांद्रयान- ३ चे प्रोप्युलशन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं
मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, काल रात्री उशिरा दिनेशचा मृत्यू झाला. रात्री १२.०८ वाजता त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिनेशला मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयातील डॉक्टरही त्यांचा प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते.मात्र, वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. दिनेश यांच्या पार्थिवावर दौलत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिनेश फडणीस यांनी ‘सीआयडी’ या लोकप्रिय टीव्ही शोमधून आपली ओळख निर्माण केली.या शोमध्ये ते इन्स्पेक्टर फ्रेडरिकच्या भूमिकेत दिसत होते.लोकांनाही त्यांची भूमिका आवडली होती.मात्र, सीआयडीनंतर ते अचानक पडद्यावरून गायब झाले.त्यांनी अभिनय सोडून मराठी चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.दिनेशच्या चाहत्यांना तो पुन्हा पडद्यावर अप्रतिम कामगिरी करताना पाहायचे होते.परंतु दुर्दैवाने याआधीच दिनेशने जगाचा निरोप घेतला.