वनविभागाच्या जमिनीवर बेकादेशीर चर्च, धर्मांतराच्या तक्रारीनंतर बुलडोझरची कारवाई !

युपी पोलिसांची कारवाई

वनविभागाच्या जमिनीवर बेकादेशीर चर्च, धर्मांतराच्या तक्रारीनंतर बुलडोझरची कारवाई !

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या चर्चवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला आहे. या चर्च मधून धर्मांतराच्या तक्रारीही येत होत्या. विनोद आणि रमाकांत नावाच्या इसमांवर चर्च बांधल्याचा आरोप आहे. या दोघांनाही एसडीएम कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते पण दोघेही गैरहजर राहिले. अखेर, आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, रविवारी (११ ऑगस्ट ) या बेकायदा चर्चवर बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण मिर्झापूरच्या अहरौरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील चुनार वनपरिक्षेत्रातील बेलखरा आणि मोहल कुमियाजवळ हे चर्च बांधण्यात आले होते. हे आठ वर्षे जुने बांधकाम वनविभागाच्या जमिनीवर झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शहरापासून दूर जंगलात राहणाऱ्या आदिवासींना या चर्चमधून धर्मांतर करण्याचे आमिष दाखवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा :

१९७१ च्या शहीद स्मारकातील पुतळ्यांची तोडफोड

आनंद रंगनाथन, जे.साईदीपक, अमिश त्रिपाठींनी सरकारला लिहिले पत्र; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार!

प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीच्या हत्येनंतर प्राचार्यांचा राजीनामा; पालक असल्याच्या नात्याने घेतला निर्णय

युपीत तीन महाविद्यालयीन मुलींनी मुद्दाम घातला हिजाब

या चर्चविरोधात तक्रारी आल्यानंतर न्यायालयाकडून चर्च बांधणाऱ्यांविरोधात नोटीस बजावली होती. मिर्झापूर येथील विनोद कुमार आणि रमाकांत यांना या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. नोटीसमध्ये दोघांनाही संबंधित सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नोटीस मिळाल्यानंतरही रमाकांत आणि विनोद दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने अवैध्य बांधकाम हटवण्याचे आदेशही दिले. मात्र, दोघांनी नोटिसला प्रतिसाद न दिल्याने अखेर कारवाई करत चर्च जमीनदोस्त करण्यात आली.

कारवाईला उपस्थित असलेले मिर्झापूरचे पोलीस अधीक्षक आयपीएस अभिनंदन म्हणाले की, काही काळापासून चर्चमधूनही बेकायदेशीर धर्मांतराच्या तक्रारी येत होत्या. धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून त्याचा तपास सुरू आहे. एसडीएम राजेश वर्मा यांनी सांगितले की, बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी झालेल्या खर्चाची भरपाई रमाकांत आणि विनोद कुमार यांच्याकडून केली जाईल.

Exit mobile version