सध्या चालू असलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात डेन्मार्क संघाचा खेळाडू ख्रिस्तियन एरिक्सन हा हृदयविकाराच्या झटक्याने मैदानात अचानक कोसळल्याने जगभरात खळबळ उडाली होती. मात्र आता एरिक्सनची तब्येत स्थिर असून त्याने चाहत्यांसाठी एक संदेश प्रसारित केला आहे. जगभरातील चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत. डेन्मार्कच्या खेळाडूंना पुढील लढतींसाठी मी प्रोत्साहित करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
यामध्ये तो म्हणतो की,
जगभरातील सर्व विविध चाहत्यांच्या शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा मोठा आधार ठरला आहे. मी सध्या चांगला असून- निरीक्षणाखाली आहे. मला रुग्णालयातील काही चाचण्यांना सामोरे जायचे आहे, परंतु माझी तब्येत सध्या उत्तम आहे. आता मी डेन्मार्कच्या इतर खेळाडूंना पुढील खेळांसाठी प्रोत्साहीत करणार आहे.
११ जून पासून युरो कप फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता डेन्मार्क आणि फिनलँड या दोन संघांमध्ये सामना खेळला जात होता. सुरुवातीपासूनच हा सामना अतिशय रंगतदार सुरू होता. पण सामन्याच्या पहिल्या सत्राची अंदाजे चाळीस मिनिटं झालेली असताना एक दुर्दैवी घटना मैदानात घडली.
हे ही वाचा:
मराठा मूक मोर्चापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी साधला संवाद
संतप्त स्वभावाच्या सेवानिवृत्त पोलिसाने मुलांनाच गोळ्या घातल्या
एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक
सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?
खेळ सुरु असताना बॉल मैदानाबाहेर जाऊन डेन्मार्क संघाला बॉल थ्रो करायची संधी मिळाली. हा थ्रो घेण्यासाठी डेन्मार्कचा खेळाडू सरसावला. त्याच्याजवळच डेन्मार्कचा प्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियन एरिक्सन उभा होता. बॉल एरिक्सनकडे फेकण्यात आला आणि बॉलच्या दिशेने धावता-धावता एरिक्सन अचानक जमिनीवर कोसळला. एरिक्सनच्या आसपास प्रतिस्पर्धी संघाचे कोणतेच खेळाडू नसल्यामुळे एरिक्सनचे असे कोसळणे खेळाच्या ओघात घडले नसल्याचे लक्षात आले. सामन्याच्या पंचांकडून लगेचच त्याची दखल घेत वैद्यकीय मदत मागवण्यात आली.
मैदानात अचानक कोसळलेल्या एरिक्सनला मैदानात सिडीआर देण्यात येत होता. पण तरीही एरिक्सन मैदानात उठला नाही. त्यावेळी हा सामना स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रात्री सामन्याला सुरूवात झाली. एरिक्सनला तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्याने आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याच्याच संदेशामुळे स्पष्ट झाले आहे.