देशभरात नवरात्रीचा उत्सव जल्लोषात साजरा होत असताना वेस्ट इंडीजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल हा सुद्धा गरब्याचा आनंद घेताना दिसला. राजस्थानच्या जोधपुरमध्ये ख्रिस गेल गरबा खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयपीएलमुळे ख्रिस गेलने भारतात खूप लोकप्रियता मिळवली असून भारतातही त्याचे अनेक चाहते आहे. गुजरात जायंट्स संघाच्या खेळाडूंसोबत ख्रिस गेल याने गरबा करण्याचा आनंद लुटला. या व्हिडीओमध्ये ख्रिस गेल लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसून येत आहे. ख्रिस गेल आनंद घेत गरबा करताना दिसत आहे.
हे ही वाचा:
दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू
नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी
‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?
गुजरात जायंट्स संघाच्या खेळाडूंसोबत गेलने नवरात्रीचा सण साजरा केला. गुजरात जायंट्सच्या टीमने गेलच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून लिहिले आहे की, “युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी ढोलच्या तालावर नाचत आहे.” राजस्थानच्या जोधपूरमध्ये गेलने गरबा खेळण्याचा आनंद घेतला तर यावेळी भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागही उपस्थित होता.
The Universe Boss @henrygayle dancing on the dhol beats to celebrate Navratri! 🔥😍@llct20 @AdaniSportsline #GarjegaGujarat #LLCT20 #BossLogonKaGame #LegendsLeagueCricket #Adani #cricketlovers #cricketfans #indiancricket #cricketfever #cricketlife #T20 #BCCI #cricket pic.twitter.com/Cv3GbcZlE6
— Gujarat Giants (@GujaratGiants) October 2, 2022