26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषचौधरी झुल्फिकार अली यांचा भाजपात प्रवेश !

चौधरी झुल्फिकार अली यांचा भाजपात प्रवेश !

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात होणार विधानसभा निवडणुका

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकारणी, गुज्जर नेते आणि माजी मंत्री चौधरी झुल्फिकार अली यांनी रविवारी (१८ ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. झुल्फिकार अली हे ‘जम्मू आणि काश्मीर अपनी पार्टी’चे (जेकेएपी) उपाध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने वकीलही आहेत. त्यांनी यापूर्वी राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झुल्फिकार अली म्हणाले की, भाजपची धोरणे आणि योजना रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे, दगडफेक संपली आहे, सामान्य माणसाला अधिक सुरक्षित वाटत आहे आणि राज्यात पर्यटन उद्योग देखील वाढला आहे.

हे ही वाचा :

‘सरकारकडून कारवाई हवी, निषेध नको!’

आम आदमी पार्टीच्या हरभजनसिंग यांनी ममतांना विचारला तिखट सवाल

ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणाऱ्या विद्यार्थ्याला टाकले कोठडीत

ओमर अब्दुल्ला म्हणतात, ‘निवडणुकीनंतर आम्ही कलम ३७० रद्द करण्याचा ठराव मांडू’

 

यापूर्वी जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसह (पीडीपी) विविध राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या झुल्फिकार यांनी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि आदिवासी प्रकरणांसह अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्री अशी महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत. झुल्फिकार मूळचे राजौरीचे असून पीर पंजाल भागात त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे भाजपला याचा फायदा होईल असे म्हटले जात आहे.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी (१६ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. केंद्रशासित प्रदेशात १८ सप्टेंबरला पहिला टप्पा, २५ सप्टेंबरला दुसरा टप्पा आणि १ ऑक्टोबरला तिसरा टप्पा पार पडणार आहे. यासोबतच ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे कलम ३७० हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी २०१४ मध्ये येथे विधानसभेची निवडणूक झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा