छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेखचा मृत्यू!

टेरर फंडिंग प्रकरणी केली होती अटक

छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेखचा मृत्यू!

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा नातेवाईक आरिफ शेख उर्फ ​​आरिफ भाईजान याचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आलेला आरिफ शेख हा छोटा शकीलचा मेहुणा होता. अटक झाल्यापासून तो आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. तुरुंगात आरिफला अचानक छातीत दुखू लागल्यानंतर पोलिसांनी उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान आरिफचा मृत्यू झाला.

अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा शकीलला मदत केल्याचा आरोप आरिफ शेखवर होता. ६१ वर्षीय आरिफ शेख याला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मे २०२२ मध्ये अटक केली होती. दाऊद इब्राहिम आणि शकीलसह दाऊद टोळीतील अनेक सदस्यांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता. अटकेनंतर तो गेल्या दोन वर्षांपासून आर्थर रोड कारागृहात होता. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, आरिफ शेख यांना शुक्रवारी (२१ जून) श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये चकमक, दोन दहशतवादी टिपले!

ग्रेट निकोबारमधील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे काँग्रेसच्या पोटात पोटशूळ

सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला रवाना!

जालन्यातील लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण स्थगित!

दरम्यान, आरिफ शेख याच्यावर दहशतवादी निधी उभारण्यासाठी मालमत्ता जप्त केल्याचा आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसोबत काम केल्याचा आरोप होता.

Exit mobile version