सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत हे देखील असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्याविषयी अद्याप कोणतीही माहिती पुरवण्यात आलेली नाही. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत , त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीही प्रवास करत होत्या असं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. इतरांचा शोध घेण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करत होते. त्यापैकी चौघांचे मृतदेह सापडल्यांच सांगितलं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या सुलूर बेसवरुन वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस कॉलेजमध्ये (Defence Services College (DSC)) हे सर्व वरिष्ठ अधिकारी निघाले होते.

हे ही वाचा:

प्राजक्त तनपुरे किरीट सोमय्यांच्या रडारवर

…म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ

चंद्रावर जाणार भारतीय वंशाचे अनिल मेनन

बापरे !! आत्महत्येची मशीन??

तमिळनाडूतील कुन्नूर येथे सैन्याचं हेलिकॉप्टर दुपारी १२:४० वाजता क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टरमधून १४ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी ४ गंभीर जखमी झाले आहेत. क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version