प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झळकला ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ’!

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रथाची संकल्पना

प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झळकला ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ’!

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रथ साकारण्यात आला.या रथावर छत्रपती शिवरायांचे बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दाखवण्यात आले आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली चित्ररथ संचलनात २८ राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवरती विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. या पार्श्वभमीवर विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५० वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचा ३५० वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून “लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज” या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते.

हे ही वाचा:

पद्म पुरस्कारांत अनोख्या कामगिरीची दखल पहिली महिला माहूत ते दिव्यांग कार्यकर्ता

भारताने पाकिस्तानसोबत नाणेफेक करून जिंकली होती राष्ट्रपती वापरत असलेली ‘बग्गी’

फ्रान्सच्या तुकडीत सहभागी असणारे सहा भारतीय कोण?

पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली इथं साकारण्यात आलेल्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आले.राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात आली.तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील १६ कलाकार या चित्ररथासोबत आपली कला सादर केली.

देशभरातून यावेळी ३० राज्यांनी चित्ररथ प्रदर्शनासाठी दावा केला होता, पण विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील १६ राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि पदेशातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भारताच्या विविध राज्यांची संस्कृती आणि वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्ररथ सादर केले जातात.

Exit mobile version