मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर आंदोलनात कसे काय झळकले?

चित्रा वाघ यांनी केला घणाघात

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर आंदोलनात कसे काय झळकले?

बदलापूर अत्याचार प्रकरण आणि महिला पत्रकाराविरुद्ध अपशब्द घटनेवर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, बदलापूरमध्ये झालेली गोष्ट वाईट आणि मनाला वेदना देणारी गोष्टी आहे. अत्याचार झालेल्या मुलींचे वय चार वर्ष असल्याने त्यांना बोलते करण्यासाठी पोलिसांना वेळ लागला, त्यामुळे एफआयआर दाखल करण्यास वेळ झाला. मात्र, एफआयआर दाखल होताच दोन तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी सरकराने एसआयटीची स्थापना केली, कोर्टात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली. संस्थेची चौकशी लावण्याचे आदेश दिलेत. पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे. फास्ट्रकवर केस चालवली जात आहे. मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलता होत्या. तसेच त्यांनी बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनावर देखील प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणावरून जनतेचा आक्रोश समजण्यासारखा आहे. मात्र, यासाठी मुंबईहून अधिक लोक आल्याची माहिती समोर आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे बॅनर झळकले. या आंदोलनातील एका महिलेने आमची भेट घेतली, त्या म्हणाल्या सकाळी १० पर्यंत आम्ही बदलाकर आंदोलन करत होतो. मात्र, थोड्या वेळानंतर अनेक लोक जमा झाले, कोण-कुठून आले आम्हाला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, या घटनेवरून अनेकांनी राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले. दुसऱ्यांचे सरकार असते तर यांनी काय केले असते. आमच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी पुढाकार घेत पटापट निर्णय घेतले, दुसरे असते तर फेसबुकवर वाफ दौडत बसले असते.

 

हे ही वाचा :

सावधान… राजकीय गिधाडे सरसावली बलात्काराच्या वणव्यात हात शेकण्यासाठी!

युवराज सिंगचा क्रिकेट प्रवास मोठ्या पडद्यावर

‘बदलापूरच्या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नका’

मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी बंधनकारक, कर्मचाऱ्यांना पीसीसी अनिवार्य !

शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराच्या बाबतीत वापरलेल्या अपशब्दांबद्दल चित्रा वाघ यांना प्रश्न विचारले असता. त्या म्हणाल्या, ज्या वेळी आपल्यावर असं कोणी बोलत असेल तर तिथेच थोबाड फोडायचं, मग तो कोणीही असो. पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे. आपण महिला सक्षम आहोत, अशी घटना घडली तर समोरच्याच थोबाड फोडायचं आणि मग पोलिसांनी जाऊन याची माहिती द्यायची. पत्रकार महिला ती तीच काम करत होती, त्यामुळे तिला असे बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही.

Exit mobile version