‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’

ठाणे पोलिसांच्या या कामगिरीचे भाजपाचे नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’

ठाण्यात शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी रिक्षाचालकाने एका मुलीला फरफटत नेल्याची घटना घडली होती. पोलिसांनी २४ तासांत आरोपी रिक्षाचालकाला अटक केली असून, पोलिसांनी त्याची रिक्षाही जप्त केली आहे. ठाणे पोलिसांच्या या कामगिरीचे भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अभिनंदन केले आहे. महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं निर्देशही यावेळी चित्रा वाघ यांनी दिले आहेत.

चित्रा वाघ यांनी या घटनेबद्दल एक ट्विट केले आहे. त्यामध्ये, काल एका विकृत रिक्षावाल्याने ठाण्यामध्ये एका मुलीची छेड काढली. ३.३० वाजता गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाल्यानंतर २४ तासांत रिक्षावाल्याला पोलिसांनी पकडलं त्याची रिक्षासुद्धा जप्त केली. हे शिंदे फडणवीस, शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. जिथे महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत

शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट

कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू

INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक संजय वाघुले त्या परिसरात होते. त्यांनी ताबडतोब पोलिसांशी पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा केले. त्यानंतर या मुलीसोबत जाऊन ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी २४ तासांत त्या रिक्षावाल्याला अटक केले. राजू आब्बायी विरांगनेलू असं या आरोपी रिक्षाचालकाचं नाव असून, तो दिघा भागात राहणारा आहे.

Exit mobile version