‘आणखी श्रद्धा होऊ नयेत ही पालक म्हणून जबाबदारी’

चित्र वाघ यांचं पालकांना आवाहन

‘आणखी श्रद्धा होऊ नयेत ही पालक म्हणून जबाबदारी’

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी देशभरात हळहळ व्यक्त केली जातं आहे. हत्येचे पुरावे शोधण्यासाठी पोलीस दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगाला महिलांसाठी पथक तयार करण्याची सूचना केली आहे. तर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेतून शिकण्याचे आवाहन केले आहे.

श्रद्धा तर गेलीच, पण आणखी श्रद्धा होऊ नयेत ही पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. पालक म्हणून जो संवाद गरजेचा आहे तो कायम ठेवल्यास या गोष्टी टाळणे शक्य आहे, असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, श्रद्धा वालकरचे प्रकरण समोर आले आणि संपूर्ण देश या प्रकरणाने देश ढवळून निघाला. एक तरुण मुलगी जिने आपल्या आईवडिलांचा विरोध जुगारून प्रेम केलं, विश्वास ठेवला आणि तिचा कसा विश्वासघात झाला, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण या घटनेतून कायतरी धडा शिकणं गरजेचं आहे. यादरम्यान, एक गंभीर बाब समोर आली असून मुलींचं गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अपहरणाचे गुन्हे वाढले असून, हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. अशा प्रक्ररणांमध्ये मुली स्वतःहून निघून गेल्या आहेत तर काहींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांना फूस लावून पळवून नेण्यात आले, अशी माहिती चित्रा वाघ म्हणाल्या.

अशा घटनांमध्ये अठरा वर्षाखालील मुलीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पोलीस सुद्धा अशा घटना गांभीर्याने पाहत आहेत. विशेष म्हणजे प्रेमप्रकरणातून मुली बाहेर गेल्याचे बऱ्याचदा दिसून येत असल्याची माहितीही वाघ यांनी दिली.

हे ही वाचा : 

‘त्या’ ट्विटमुळे रिचा चढ्ढावर नेटकरी संपातले

विक्रम गोखले यांच्या मृत्यूचे खोटे वृत्त व्हायरल

‘काँग्रेस म्हणजे घराणेशाही’

दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?

पालकांच्या जबाबदारी विषयी त्यांनी सांगितले की, अशा प्रकरणात अनेक मुली घरी परत आल्यावर त्यांचे पालक बदनामी आणि पोलिस चौकशी यांच्या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत. त्यामुळे अशी अनेक प्रकरणं दाबून टाकली जातात. मात्र प्रत्येक पालकाने मुलगी किंवा मुलगा यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, असं आवाहन चित्रा वाघ यांनी पालकांना केलं आहे.

Exit mobile version