रेल्वेने कामावरून घरी परतताना चोरट्याशी झालेल्या झटापटीत मृत्युमुखी पडलेल्या विद्या पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांची मदत भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.
विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल एका चोरट्याने हिसकावून घेताना त्यांचा धावत्या लोकलमधून तोल गेला आणि लोकलखाली आल्या. त्यांचा जागीच मृत्यु झाला होता.
ठाणे ते डोंबिवली लोकल प्रवासादरम्यान विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल खेचून चोरट्याने पळ काढला होता. त्याचा पाठलाग करताना त्यांनी लोकलमधून उडी मारली. त्यानंतर चोरट्याशी त्यांची झटापट झाली. मात्र त्यातच त्या लोकलखाली गेल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे ७ महिन्यांच्या परीसह ९ वर्षांची पूर्वा, ७ वर्षांची मेधा या तीन मुली पोरक्या झाल्या. चित्रा वाघ यांनी या कुटुंबाची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी भाजपाचे नगरसेवक विकास म्हात्रे, नगरसेविका कविता म्हात्रे, संदीप पुराणिक यांच्यासह भाजपा कार्यकर्ते होते.
हे ही वाचा:
टाटा सन्सच्या बोर्डासाठी नोएल टाटांचे नाव?
शिवसेना नाशिक महानगरपालिका स्वबळावर लढवणार
नाल्यातला गाळ काढण्याऐवजी महापालिकेने करातून माल काढला
काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद भाजपात
कळवा स्टेशनवर ही घटना घडली. रेल्वेच्या दरवाजाजवळील सीटच्या कोपऱ्यावर बसलेल्या विद्या पाटील यांच्याकडून फैझल शेख या चोरट्याने मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला जोरदार प्रतिकार केला. पण सराईत गुन्हेगार असलेला शेख धावत्या लोकलमधून पळाला. त्याचवेळी त्याने विद्या पाटील यांनाही ढकलले. त्यात त्या गाडीखाली आल्या.
पोलिसांनी ताबडतोब सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्याला पकडले. तो याआधीही सोनसाखळी चोरी प्रकरणात पोलिसांना हवा होता. त्याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली होती.