भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी(९ जानेवारी) एका भव्य समारंभात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.यामध्ये बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांची २०२३ मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. २०२३ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले. बॅडमिंटनमध्ये हे देशाचे पहिले सुवर्णपदक होते.चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांची जोडी सध्या मलेशिया ओपन सुपर १००० मध्ये खेळत असल्याने त्यांना या समारंभाला उपस्थित राहता आले नाही.दरम्यान, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणारा क्रीडा पुरस्कार सोहळा गेल्या वर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या हांगझो आशियाई खेळांमुळे पुढे ढकलण्यात आला होता.
विश्वचषकात शमी संघाचा हिरो
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या वर्षी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत सर्वाधिक २४ बळी घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शमीने अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद असल्याचे म्हटले. शमी म्हणाला की, हा पुरस्कार मिळाला तर आनंदाची गोष्ट आहे. हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही.
दरम्यान, ३३ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज शमी सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. याच कारणामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळू शकला नाही. पण आता तो इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळेल अशी अपेक्षा आहे
नुकतीच बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेल्या आर वैशालीलाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती स्टार ग्रँड मास्टर आर प्रज्ञनंदाची मोठी बहीण आहे.कोनेरू हंपी आणि द्रोणवल्ली हरिका यांच्यानंतर ग्रँड मास्टर बनणारी वैशाली ही देशातील तिसरी महिला खेळाडू आहे.
हे ही वाचा:
लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम
राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार
अयोध्येत एकाचवेळी १२००चपात्या बनवणारी मशीन पोहोचली!
मालदीवची भारतविरोधी ज्योत मालवली! घेतली नरमाईची भूमिका
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२३– चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)
अर्जुन पुरस्कार २०२३– ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाला (अश्वस्वार), दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कब्बडी), रितू नेगी (कब्बडी), नसरीन (खो-खो), सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स), ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग), सुश्री ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती, सुश्री अँटिम (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार– ललित कुमार (कुस्ती), आर.बी. रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंग (हॉकी), गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)