विलेपार्ले येथील द्वारकादास जे. संघवी कॉलेजच्या इंजीनिअरिंगच्या मुलांना पुढील वर्षी इंडोनेशियातील एका शेल इको मॅरेथॉन या ऑफट्रॅक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी एक इलेक्ट्रिक कारही बनविली आहे. या चमूमध्ये चिपळूणचा सुपुत्र असलेल्या संकेत विजय कदम याचाही समावेश आहे. संकेत कदम म्हणतो की, आम्हाला या प्रोजेक्टसाठी कॉलेज काही प्रमाणात निधी देते किंवा मग आम्हाला उभा करावा लागतो. आमच्या क्षेत्राशी संबंधित कंपनीकडून आम्हाला निधी मिळू शकतो.
आता या स्पर्धेत एकूण चार संघांनी भाग घेतला आहे. या गाडीसाठी १५ ते १६ लाख खर्च आलेला आहे. बॅटरी, मोटर, मोल्ड बनविण्याासाठी हा खर्च आलेला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक संघ स्वतःच्या अशा गाड्या तयार करतात.
या स्पर्धेसाठी ३ हजार डॉलरचे बक्षीस असते. वेगवेगळ्या विभागातही पुरस्कार असतात. नवे डिझाइन, नवी बांधणी याचा विचार केला जातो. या स्पर्धेचा फरारीसोबत करार आहे. त्यामुळे टॉप ५ मध्ये आलेल्या संघाला फरारी मोटरस्पोर्टसची इंटर्नशीपची संधी मिळते.
संकेत हा मार्गताम्हाणे, चिपळूणचा आहे. १० वी पर्यंतचे त्याचे शिक्षण चिपळूणला झाले. नंतर तो डिप्लोमासाठी मुंबईला आला. आता बी.टेक करतो आहे. या स्पर्धेविषयी तो म्हणाला की, २०२६च्या स्पर्धेसाठी आम्ही डिझायनिंग करत आहे. याला प्रोटोटाइप डिझाइन म्हणतात. या गाडीत झोपून ती चालवायची आहे. पुढे अर्बन म्हणून डिझाइन येईल. ती गाडी थोडी अधिक अवघड आहे.
लहानपणापासूनच टेक्निकल क्षेत्राची आवड असणाऱ्या संकेतचे मिरजोळी येथील इंग्रजी माध्यमात १० वी पर्यंत शिक्षण झाले. येथे त्याने ९० टक्के गुण मिळवले. यानंतर डिप्लोमा करण्यासाठी मुंबई बांद्रा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून येथे ९१ टक्के गुण मिळवले.
यानंतर पुढील डिग्रीसाठी मुंबई विलेपार्ले येथील प्रसिध्द द्वारकादास जे. संघवी येथे प्रवेश मिळवून आज तो येथे बी.टेक.च्या पदवीचे शिक्षण घेत आहे. अभियांत्रिकीचे विद्यार्थी या नात्याने वर्गातील ज्ञान आणि वास्तविक-जागतिक समस्या-निवारण यांच्यातील अंतर कमी करण्यास संकेत आणि त्याचे सहकारी मित्र उत्सुक होते. आमच्या शिक्षणाने आम्हाला सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
हे ही वाचा:
शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!
सुशिकला आगाशे, मयुरी लुटे भारतीय संघात
मायलेकीवर चाकूने हल्ला करून ३० वर्षीय इसमाची आत्महत्या
महिंद्र अँड महिंद्रची कॅनडातील उपकंपनी बंद
संकेतने सांगितले की, आमचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट स्पष्ट होते. एक प्रोटोटाइप बॅटरी इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहन विकसित करणे. कार्बन फायबरपासून संपूर्ण वाहन तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला हा प्रकल्प वेगळा ठरला. आमचा विश्वास होता की कार्बन फायबरच्या शक्तीचा उपयोग करून, आम्ही इंधन कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढवू शकतो. संकेत सांगतो की, शेल इको मॅरेथॉन सारख्या नामांकित स्पर्धांमधील आमच्या सहभागाने इंधन कार्यक्षमता वाढविण्याचे आमचे समर्पण अधोरेखित केले आहे.
ऑफट्रॅक स्पर्धा इंडोनेशियामध्ये आयोजित केली जाते. खरोखर उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आमची टीम आव्हानात्मक कोवीड आपत्तीत एकत्र आली. अडथळ्यांना न जुमानता, आम्ही काम केले. या चमूमध्ये दिशिता चावडा, जय गाला, संकेत कदम, आदित्य करणी, भार्गवी दांडेकर, प्रथमेश मंत्री, जिनेश प्रजापती, आयुष गवई, सानिया शेट्टी, हर्ष प्रजापती, ओम चोटालिया, आदित्य नलावडे, विराज संघवी, मानव नागवेकर यांनी सहकार्य केले.