25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषआता उरलाय चिखल...चिखल...आणि फक्त चिखल...

आता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…

Google News Follow

Related

मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर चिपळूणमध्ये पुरानं चांगलंच थैमान घातलंय. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, पुरानंतरचं वास्तव अंगावर येतंय. या ठिकाणी अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक चिपळूणकर या पुराच्या संकटाने अगदीच कोलमडून गेली. आता चिपळूणकरांची परीक्षा असणार आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्याने खेडमध्ये जगबुडी आणि नारिंगी नदीला महापूर येऊन शहर व ग्रामीण भागांची दैना झालेली आहे. तसेच शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून, पदरी केवळ जगण्याची आशा उरली आहे.

अनेक बाजारपेठा पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तसेच दरड कोसळून खेडमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला. चिपळूणच्या रस्त्यावर आज फक्त चिखलाचं साम्राज्य आहे. भर रस्त्यावर चिखल आणि संसारही चिखलात अशीच चिपळूणची अवस्था आहे. सद्स्थितीला चिपळूणकरांपुढे घरातून चिखल बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच अनेकांच्या घरात ४ फुटांपासून ते २० फुटांपर्यंत पाणी आल्यामुळे घरात काहीच शिलल्क राहिले नाही अशी परिस्थिती आहे. सर्वकाही वाहून गेलेलं आहे. घरे व दुकाने चिखल मातीने भरून गेली आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पुरस्थिती आटोक्यात आल्यानंतर हे विदारक दृश्य समोर आल्यानंतर कोकणवासीय पार हेलावले आहेत.

हे ही वाचा:
‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार

दरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…

तालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज

वरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात

चिपळूणच्या बाजारपेठा पाण्याच्या वेढ्यातून मुक्त झाल्यावर सर्वच ठिकाणी चिखलाचे सम्राज्य पसरले आहे. चार चाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, पाण्याच्या टँकरच्या मदतीने स्वच्छता करण्याच्या कामाला नगरपालिका, आरोग्य संस्था लागल्या आहेत. घराची अवस्था पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. पाणी ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर अनेकांची चारचाकी आणि दुचाकी जाग्यावर नसल्याचे आढळले. काहींची वाहने वाहून गेली तर काही वाहने पाण्याच्या प्रवाहामुळे उलटी झालेली दिसली.

चिपळूण आगाराचे आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांच्यासह ९ कर्मचारी याच पुरात अडकले. या १० जणांनी एसटीचाच आधार घेतला आणि टपावर चढले. राजेशिर्के यांच्याकडे एसटी आगारातील साडेसात लाखांची रोकड होती. तब्बल आाठ तास हे कर्मचारी बस टपावर अडकून होते. चिपळूण येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा