‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये!

भाजप नेते प्रवीण दरेकरांकडून संजय राऊतांचा समाचार

‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये!

‘धर्मवीर-२’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चित्रपटाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्याआधी २६ सप्टेंबर रोजी एका विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर-३’ चित्रपटाची पटकथा स्वतः लिहिणार असल्याचे म्हणाले होते. यावरून आजच्या सामना अग्रलेखात फडणवीसांना ‘सिंघम’ असे म्हटले आहे. आता याचा मुद्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका करत संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

प्रवीण दरेकर यांनी ट्वीटवर पोस्ट करत म्हणाले, महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली आहे. ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : 

संजय राऊत यांचे स्वतंत्र न्यायालय आहे!

सेक्युलर फॅब्रिकच्या चिंध्या कुणी केल्या ते पप्पांना विचारा!

महाराष्ट्र काँग्रेसचा हिरवा टीजर कर्नाटकात जारी…

जरांगेंनी विश्वासार्हता गमावलीय काय?

ते पुढे म्हणाले, धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो. देवेंद्र फडणवीस जी हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी तुमचं ‘चक्रव्यूह‘ भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्रजी फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलंच. पण त्यापूर्वी पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा.

मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली. ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. देवेंद्रजी फडणवीस जी हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या ‘नालायका‘च्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

Exit mobile version