25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषचीन आज सैन्य मागे घेणार?

चीन आज सैन्य मागे घेणार?

Google News Follow

Related

भारत आणि चीनच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी १०.३० वाजता होणार आहे. देशांदरम्यानची ही १२ वी बैठक असून हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागातील आपलं सैन्य चीनने माघारी घ्यावं अशी भारताची भूमिका असणार आहे.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला या दोन देशांनी तथाकथित वादग्रस्त भागातून आपलं सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु केली होती. तरीसुध्दा या दोन्ही देशांमध्ये तणाव कायम होता. या महिन्यात दोन्ही देशांतील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यावर एकमत झालं.

गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याच्या चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीला जवळपास सव्वा वर्ष पूर्ण झालं आहे. मागील वर्षी १५ जून रोजी चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताचे २० सैनिक शहीद झाले होते, तर चीनने केवळ चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं होतं.

भारत आणि चीन दरम्यान आजची ही १२ वी बैठक आहे. हॉट स्प्रिंग आणि गोगरा या भागातून चीन आपले सैन्य माघार घेणार का याकडे भारताचं लक्ष लागलं असून त्या दृष्टीने आजची बैठक महत्वाची आहे.

हे ही वाचा:

सर्वसामान्यांचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

पॅकेजच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वाजवली जुनीच टेप! म्हणाले…

ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

अनिल देशमुख यांची अटक निश्चित

या दोन्ही देशांनी एलएसीवरून आपापले सैन्य माघार घेण्याचं ठरवलं असलं तरी त्या ठिकाणी चीनच्या कुरापती काही कमी होत असल्याचं दिसून येत नाही. गेल्या महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने युद्धाभ्यास केला होता. पॅनगॉंग लेकजवळ अद्यापही चीनचे सैन्य कायम असून त्या ठिकाणी चीनी सैनिकांनी लष्करी तळ उभारला आहे. या ठिकाणी चीनने इंधनाचा साठाही करुन ठेवल्याचं उपग्रह छायाचित्रातून स्पष्ट झालं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. चीनचे मागील अनुभव लक्षात घेता तो इतक्या सहजासहजी सैन्य मागे घेणार नाही. कोवीड मुळे झालेल्या चीनी सरकारच्या कोंडी कडून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांना भारताबरोबर कुरबुरी चालू ठेवणे भाग आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा