१९६२ मध्ये चीनने हल्ला केला तेव्हा लढण्याऐवजी जवाहरलाल नेहरूंनी आसामला बाय बाय केले होते.आसाम सोडले होते. पण नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये चीनला देशाची एक इंचही जमीन काबीज करता आली नाही, असे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आसामच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी(९ एप्रिल) त्यांनी राज्यातील लखीमपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात चीन भारताची एक इंचही जमीन काबीज करू शकला नाही. ते पुढे म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६२ मध्ये चीनच्या आक्रमणावेळी आसाम आणि अरुणाचलला एकटे सोडले होते आणि हे लोक कधीही विसरणार नाहीत.
हे ही वाचा:
प्रेमप्रकरणे, प्रेमविवाहाचे धोके सांगण्यासाठी केरळमध्ये दाखवला ‘द केरळ स्टोरी’
काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश
‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’
‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’
ते पुढे म्हणाले की, चीनने हल्ला केला तेव्हा… लढण्याऐवजी जवाहरलाल नेहरूंनी आसामला बाय बाय केले होते. आसाम सोडले होते. पण नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये चीनला देशाची एक इंचही जमीन काबीज करता आली नाही.अरुणाचल आणि आसाम १९६२ कधीही विसरू शकत नाही. नरेंद्र मोदींच्या काळात (चीनने) डोकलाममध्ये थोडी हिंमत दाखवली होती…त्यांना ४३ दिवस रोखून ठेवले आणि नरेंद्र मोदींनी परत जाण्यास भाग पाडले.
गृहमंत्री म्हणाले की, केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बांगलादेशला लागून असलेली देशाची सीमाही सुरक्षित केली आणि घुसखोरी थांबवली. ते पुढे म्हणाले, आगामी काळात आसाम हे देशातील इतर राज्यांप्रमाणे विकसित राज्य बनेल. काँग्रेस पक्षाने अनेक वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा प्रलंबित ठेवला होता. हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या काळात आला. भूमिपूजन झाले आणि शेवटी २२ जानेवारीला अभिषेक झाला.