झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात. यात आता झारखंडमधून बालविवाहाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गृहमंत्रालयाने केलेल्या लोकसंख्याविषयक नमुना सर्वेक्षणातून ही बाब समोर आली.
झारखंडमध्ये बालविवाहाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच ५.८ टक्के आहे. तसेच झारखंडमध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच विवाह होण्याचे प्रमाण १.९ टक्के आहे. झारखंडमध्ये ग्रामीण भागात बालविवाहांचे प्रमाण ७.३ टक्के एवढे असून नागरी भागामध्ये ते तीन टक्के असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर केरळमध्ये बालविवाहाचे प्रमाण शून्य टक्के आहे.
वयाची २१ वर्ष पूर्ण होण्याआधी झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये महिलांचे विवाह होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ५४. ०९ टक्के मुलींचे विवाह हे वयाच्या २१ वर्षाआधीच केले जातात. झारखंडमध्ये हेच प्रमाण ५४.६ टक्के एवढे आहे. तर देशात २९.५ टक्के मुलींचे विवाह २१ वर्षांच्या आत होत आहेत.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर
अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का
या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
एकीकडे बालविवाहाचे प्रमाण अधिक असताना दुसरीकडे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्यूरोचाही अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, २०१५ मध्ये झारखंडमध्ये जादुटोण्याच्या संशयाप्रकरणी ३२ जणांचा बळी गेला. तर २०१६ मध्ये २७, २०१७ मध्ये १९, २०१८ मध्ये १८ आणि २०१९ व २०२० मध्ये प्रत्येकी १५ जण जादुटोण्याच्या संशयातुन मारले गेले होते. तसेच झारखंडमध्ये मुलींवर हल्ले करण्याचे प्रमाण देखील अधिक आहे.