…आणि नंदुरबारच्या लहानग्याला मिळाले मुंबईत जीवनदान!

…आणि नंदुरबारच्या लहानग्याला मिळाले मुंबईत जीवनदान!

नंदुरबारमधील सुरेश कुटा पवार या शेतकऱ्याच्या घरात बाळाचे आगमन झाले. काही दिवसांतच या लहानग्याच्या नाकाजवळील आणि डोळ्याकडच्या भागाला सूज यायला सुरुवात झाली. त्यामुळे मुलाला श्वास घ्यायला आणि दूध प्यायला त्रास होऊ लागला. बाळाच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी स्थानिक रुग्णालयात धाव घेतली, परंतु त्याच्या तब्येतीत काहीच सुधारणा न झाल्यामुळे तेथील डॉक्टरांनी कुटुंबियांना मुंबईतील लहान मुलांसाठी असलेल्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात नेण्यास सांगितले. वाडिया रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान मुलाला एन्सेफेलॉसेस नावाचा दुर्मिळ आजार असल्याचे निष्पन्न झाले.

रुग्णालयात दाखल करताना मुलाच्या नाकावर आणि डोळ्यांवर सूज होती. त्याला एन्सेफेलॉसेस हा आजार असल्याची माहिती वाडिया रुग्णालयाचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर देवपुजारी यांनी दिली. कोरोनाचे सर्व नियम पाळून मुलाच्या मेंदूची शस्त्रक्रिया करायची असा निर्णय घेण्यात आला. मुलावर क्रैनियोटॉमी पद्धतीने आठ तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर मुलाला दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेऊन नंतर सामान्य विभागात ठेवण्यात आले. एन्सेफेलॉसेस या आजारावर वेळेत उपचार झाला नसता तर तो संपूर्ण शरीरात पसरण्याचा धोका होता. त्यामुळे या आजाराचे वेळेत निदान आणि त्यावर उपचार होणे अत्यंत आवश्यक असते.

हे ही वाचा:

ऑलिम्पियन फुटबॉलपटू एस.एस. बाबू नारायण कालवश

आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…

…म्हणून मिराबाईने केला १५० ट्रक चालकांचा सत्कार

शर्लिन चोप्राच्या जबाबातून आता पोलखोल होणार

दहा हजारांमध्ये एका बालकाला हा आजार होण्याची शक्यता असते. एन्सेफेलॉसेस हा आजार जन्मतःच होतो. फोलिक अ‍ॅसिडची कमतरता किंवा अनुवांशिकतेमुळे हा आजार होण्याची शक्यता असते.

Exit mobile version