मोबाईल वर गेम खेळण्यास मना केल्याने मुलाची आत्महत्या

मोबाईल वर गेम खेळण्यास मना केल्याने मुलाची आत्महत्या

वडिलांनी मोबाईल फोनवर गेम खेळण्यास मनाई केल्यामुळे १६वर्षीय मुलाने नैराश्यापोटी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मालाड मालवणी परिसरात घडली. या प्रकरणी मालवणी पोलिसानी अपमृत्यू नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा अल्पवयीन मुलगा हा मालाडमधील मालवणी येथील गेट क्रमांक ५ येथे आई-वडिलांसोबत राहत होता. १६ नोव्हेंबर रोजी, त्याच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर गेम खेळणे थांबवून त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगून मूलाकडे असलेला मोबाईल फोन वडिलांनी काढून घेतल्यामुळे त्याने वडिलांसोबत वाद घातला.

त्यानंतर रात्री अकरा वाजता सर्वजण झोपी गेले,दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलाच्या वडिलांना जाग आली तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा स्वयंपाक घरातील छताला दुपट्ट्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला,
मुलगा जिवंत आहे या आशेने, वडिलांनी त्याला खाली उतरवून नजीकच्या अटलांटा या खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.

हे ही वाचा:

श्रीलंका सरकारकडून बीसीसीआय सचिव जय शहांची माफी

दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय

ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक

वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहायला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

मालवणी पोलिसांनी वडिलांचा जबाब नोंदवला असून त्यात त्यांनी सांगितले की, आपल्या मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन होते. “अनेक वेळा त्याच्या वडिलांनी त्याला जास्त वेळ गेम खेळत जाऊ नको असे बजावले होते, काही दिवसांपूर्वी गेम खेळण्यावरून त्यांच्यात वाद देखील झाला होता, त्यावेळी मुलाने वडिलांना म्हणाला की त्याला गेम खेळण्यापासून रोखले तर तो स्वतःला इजा करून घेईल अशी धमकी दिली होती.याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version