‘छेल्लो शो’ मधील बालकलाकाराचे कर्करोगाने निधन

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बाल कलाकाराची आजाराने प्राणज्योत मालवली

‘छेल्लो शो’ मधील बालकलाकाराचे  कर्करोगाने निधन

‘छेलो शो’ या गुजराती फेम चित्रपटातील बालकलाकार राहुल कोळी यांचे वयाच्या १० व्या वर्षी निधन झाले. तो रक्ताच्या कर्करोगाशी लढत होता. राहुलच्या वडिलांनी सांगितले की, दिवंगत बाल कलाकाराला मृत्यूपूर्वी वारंवार ताप येत असे आणि रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. ‘छेलो शो’ ज्याला इंग्रजीत ‘लास्ट फिल्म शो’ असे शीर्षक म्हटले जाते. त्याची ९५ व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत त्याची निवड झाली आहे.

मुलाचे अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर कुटुंबीय ‘छेलो शो’ एकत्र पाहतील, जो १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. रविवार २ ऑक्टोबर रोजी त्यांनी नाश्ता केला आणि त्यानंतर वारंवार ताप येत असल्यामुळे पुढच्या काही तासांत, राहुलला तीन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या असे राहुलचे वडील रामू कोळी यांनी सांगितले, आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्याचे अंतिम विधी पार पाडल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी रिलीजच्या दिवशी त्याचा ‘शेवटचा चित्रपट ‘छेल्लो शो’ एकत्र पाहू, असे त्याचे वडील रामू कोळी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

 म्हणून रशियाकडून ‘मेटा’ दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

जामनगरजवळील हापा गावात राहुलच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी प्रार्थना सभा घेतली. उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवणारे त्यांचे वडील, त्यांचा मुलगा चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असल्याचे शेअर केले. तो म्हणाला: “तो खूप आनंदी होता आणि मला अनेकदा सांगत असे की १४ ऑक्टोबर नंतर आमले आयुष्य बदलेले असेल. पण त्याआधीच तो आम्हाला सोडून गेला.” या चित्रपटात राहुलने मनूची भूमिका साकारली होती.

Exit mobile version