उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ‘फाळणी वेदना स्मरणदिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानबाबत मोठा दावा केला आहे. पाकिस्तान भारतात विलीन होईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ‘फाळणी वेदना स्मरणदिना’निमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दावा करत म्हटले की, ‘एकतर पाकिस्तान विलीन होईल अथवा नष्ट होईल’. ते पुढे म्हणाले, १९४७ मध्ये जे घडले तेच आता बांगलादेशात घडत आहे.
ते पुढे म्हणाले, फाळणीच्या दु:खद घटनेबद्दल काँग्रेस कधीही माफी मागणार नाही. काँग्रेसला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा-तेव्हा त्यांनी देशाचा गळा घोटण्याचे काम केले आहे. त्यांच्या पापांची कधीच क्षमा होऊ शकत नाही. बांगलादेशात १९४७ मध्ये २२ टक्के हिंदू होते, आज फक्त ७ टक्के उरले आहेत. १९४७ मध्ये भारताच्या राजकीय नेतृत्वाची प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कोणतीही शक्ती ही अनैसर्गिक फाळणी घडवून आणू शकली नसती. पण काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताचा नाश झाल्याचे त्यांनी संगितिले.
हे ही वाचा:
केजरीवालांना दिलासा नाहीच; अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये चकमक, लष्कराचा कॅप्टन हुतात्मा !
रोहिंग्या, बांगलादेशी मुस्लीम घुसखोरांना गावात राहण्यास, व्यापार करण्यास मनाई
नालासोपारामध्ये पोलिसांची कारवाई; दोन कोटींच्या अमली पदार्थांसह नायजेरीयन महिलेला ठोकल्या बेड्या
१९४७ मध्ये घडलेली तीच गोष्ट आज बांगलादेशात घडत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की, त्याचे भारतात विलीनीकरण निश्चित आहे. बांगलादेशातील हिंदू आपल्या जिवाची याचना करत आहेत. बांगलादेशातील हिंदूंसाठी कोणी काही बोलत नाही. भारतात काही लोकांच्या तोंडाला टाळे लागले आहे.
ते पुढे म्हणाले, १९४७ मध्ये पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष तिरंगा फडकावून आनंदोत्सव साजरा करत होते, तेव्हा असंख्य लोकांना मातृभूमी सोडावी लागली होती. ते म्हणाले, गेल्या १० वर्षातील भारताच्या प्रगतीने जगाला चकित करून टाकले आहे. त्यामुळे जगात कुठेही संकट आले तर सर्वांची नजर भारताकडे असते.