महाविकास आघाडी नव्हे ही महाअनाडी आघाडी, त्यांना देश, धर्माची चिंता नाही!

मुख्यमंत्री योगींची काँग्रेसवर जोरदार टीका

महाविकास आघाडी नव्हे ही महाअनाडी आघाडी, त्यांना देश, धर्माची चिंता नाही!

राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज (६ नोव्हेंबर) वाशीम दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची आठवण करत सर्वांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभेला संबोधित करताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीवर मला जनतेशी संवाद साधण्याचा पुन्हा योग मिळाला. निवडणुकीचा काळ सुरु आहे, एकीकडे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या रुपात महाअनाडी युती आहे. महाअनाडी यासाठी म्हणत आहेत, कारण यांना देश आणि धर्माची चिंता नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष भारताच्या स्वाभिमान आणि सन्मानचा संघर्ष होता. औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले.

काँग्रेसने बरेच वर्ष देशात सरकार चालवले मात्र इमानदारीने कधीही गरिबासाठी काम केले नाही. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभव करणारी हीच काँग्रेस आहे. पाकिस्तानी आतंकवाद, चीन भारताच्या प्रदेशात अतिक्रमण करून शिरकाव करायचा आणि आम्ही यावर जेव्हा आवाज उठवायचो तेव्हा काँग्रेस बोलत असे, शांत बसा नाहीतर देशाचे संबध बिघडतील. काँग्रेसला देशाची नाहीतर संबंधांची चिंता होती. मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये हा नवा भारत आहे. जर भारताच्या सीमांवर अतिक्रमण कराल तर ‘राम-राम सत्य है’ अशी यात्रा निघेल, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.

हे ही वाचा :

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला

ब्रिजेश सिंह यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याचे उदाहरणच घालून दिले आहे!

सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या मुस्लीम व्यापाऱ्याविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या हिंदुंवर पोलिसांचा हल्ला

‘हिंदू विरोधात गरळ ओकणा-यांचे पाय विधान भवनाकडे वळण्‍याआधीच कलम केले जातील’

ते पुढे म्हणाले, भारतावर हल्ला कराल तर सर्जिकल स्ट्राईक होईल, पाकिस्तानने अनुभवले आहे, त्यावेळी आर्धा पाकिस्तान थरथर कापला होता. भारतात जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा पासून भारताचे चित्र बदलले आहे. ५०० वर्षानंतर अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर बनले, जम्मू-काश्मीरमध्ये कलम-३७० हटवले. हा नवा भारत आहे, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे अभियान चालू आहे. यामध्ये महाराष्ट्राने अधिक मजबुती द्यावी, यासाठी मी येथे आलो आहे. महाअनाडी आघाडीवर विश्वास ठेवू नका. एकेकाळी हीच लोक प्रभू रामांच्या अस्तित्वावर बोट ठेवत होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेवून आलो असल्याचे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकजूट करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे तुम्हाला सांगतो, एकजूट रहा, नाहीतर ‘बटेंगे तो कटेंगे’, आपण जेव्हा एक असू तेव्हा सुरक्षित असू.

 

Exit mobile version