मुख्यमंत्री शिंदेंच्या मेळाव्यासाठी मुंबईत आलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कार्यकर्ता मुंबईत दाखल झाला होता

मुख्यमंत्री शिंदेंच्या मेळाव्यासाठी मुंबईत आलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू

राज्यात आज दसऱ्याचा उत्साह असताना मुंबईत मात्र आज एकनाथ शिंदेंचा आणि उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. त्यानिमित्त दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या एका कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. श्रीकृष्ण मांजरे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.

यवतमाळ येथून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मांजरे आले होते. दरम्यान, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ ते मुंबई या प्रवासादरम्यान श्रीकृष्ण मांजरे यांचे निधन झालं आहे.

दसरा म्हणजे शिवसेनेचा मेळावा असे समीकरण गेली कित्येक वर्षे आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थनात असलेल्या आमदारांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आज मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मेळावे पार पडणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आता यंदाच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा 

नवरात्र २०२२: सतीचे दात इथे पडले म्हणून दंतेश्वरी शक्तीपीठ

सी- लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू

दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी

२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले

एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून तीन लाख लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. तसेच कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यासाठी बस, ट्रेन बुक करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्यासाठी जेवण आणि इतर सोयी देखील करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version