महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्तानं बुधवार, १ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्याची प्रगती, विकासकामे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम यावर भाष्य केले. तसेच त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हुतात्मा स्मारकाकडे आल्या नंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. १०६ हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आपल्या राज्याने देशाला विचार दिले, संविधान दिलं, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा काम महाराष्ट्र करतो आहे. गेल्या दोन वर्षात सामान्य लोकांच्या सरकारने अनेक योजनांना चालना दिली आहे. हे काम आम्ही महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्याचा प्रयत्न करतो आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात देशाची प्रगती केली आहे. आम्ही आरोपांना उत्तर न देता कामाने उत्तर देत आहोत. घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा रहात नाही. काम करणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहतो, असा टोला उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी लगावला.

हे ही वाचा:

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन: कथा अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची!

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा षटकार!

कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या भाचीने केली ‘व्होट जिहाद’ ची घोषणा

गिरणी कामगारांच्या घरांविषयी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. “मुंबई ही कामगारांच्या कष्टाने, मेहनतीने उभी राहिली आहे. सर्वातआधी आमच्या सरकारने गिरणी कामगारांना घर देण्याचा निर्णय घेतला. जवळपास पाच हजार गिरणी कामगारांना घर देण्यात यशस्वी ठरलो आहोत, याचं समाधान आहे. जेवढे गिरणी कामगार पात्र आहेत, त्या सर्वांना जिथे शक्य आहे, तिथे घर देणार. त्यांच्या कष्टाचे, घामाचे चीज झाल्याचे समाधान मिळेल,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Exit mobile version