मुख्यमंत्री शिंदे बनले देवदूत! अपघातग्रस्तांना दिला मदतीचा हात

मुख्यमंत्री शिंदे बनले देवदूत! अपघातग्रस्तांना दिला मदतीचा हात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात असतात याचे अनेकदा दर्शन झाले आहे. अशाचं त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. रस्त्यावरील अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. रात्री उशिरा दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी परतत होते त्यावेळी त्यांना अपघात झाल्याचे कळले. तेव्हा त्यांनी तातडीने या अपघातग्रास्तांची मदत केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने त्यांच्या निवासस्थानी जात होते. आपल्या घराकडे परतत असताना त्यांना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे समजले. यावेळी त्यांनी तातडीने त्यांचा ताफा थांबवण्याच्या सूचना दिल्या. तत्काळ त्यांनी गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची माहिती मिळताच आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणाची आणि एका मुस्लिम कुटुंबाची चौकशी केली. यात तरुण आणि मुस्लिम कुटुंबातील महिलेला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले. तसेच सोबत आपला अधिकारी देखील मदतीसाठी दिला. रात्री उशिरा त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघेही सुखरूप असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा..

‘डीपफेक’ तंत्रज्ञानाला आळा घालण्यासाठी सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार!

‘दिल्लीच्या जलसंकटावर आतिशी खोटे बोलत आहेत’

दहशतवादविरोधी कारवाया तीव्र होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक

पंतप्रधान मोदींनी ‘ग्लोबल साऊथ’चे नेते म्हणून भारताची प्रतिमा केली मजबूत

एवढ्या अपरात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून मदत केल्याने अपघातग्रस्तांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. मात्र, यानिमित्ताने त्यांच्यातील संवेदनशील स्वभावाचा पुन्हा नव्याने अनुभव आला.

Exit mobile version