एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, ११८ कर्मचाऱ्यांना घेणार कामावर

एसटी महामंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे अदेश

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, ११८ कर्मचाऱ्यांना घेणार कामावर

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षीच्या दिवाळीत सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप तब्बल पाच महिने सुरू होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची तड लावण्यासाठी आंदोलनंही झालं . परंतु मविआ सरकारनं त्यांचा हा प्रश्न ताटकळतच ठेवला होता. या संपामध्ये ११८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी संप काळात निलंबित केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मागील वर्षी दिवाळीच्या सुमारास सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला जवळपास एक वर्ष पूर्ण झाले आहे . राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ  काळात घेतलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय पुन्हा फिरवून उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का दिला अहे. शुक्रवारी झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संप काळात निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले. या अदेशामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा कामावर रुजू हेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दिवाळी तोंडावर आलेली असताना एसटी कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट मुख्यमंत्र्यांनी दिली अहे.

विलीनीकरण पगारवाढ तसेच अन्य काही मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी ८ नेव्हेंबर २०२१ रोजी संप पुकारला हेता. तब्बल पाच महिने सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले. प्रवाशांनाही मनस्ताप भेगावा लागला . संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांची आ र्थिक घडीही विस्कळीत झाली हो ती. त्यातून कोरोना काळ असल्याने परिस्थिती आ णखी बिघडली होती. तत्कालीन सरकारकडून अनेकदा वाटाघाटी होऊनही एसटीचा चक्का जामच राहिला .

हे ही वाचा:

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक

त्यातच या संपाला गालबेट लागले. एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करत दगडफेक केली . या प्रकरणी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार या ११८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. बडतर्फ करण्यात आलेल्या या कमचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार नसल्याचे सांगितलं होतं. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देताना त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष म्हणजे मागील वर्षी ८ नेव्हेंबरला हा संप पुकारला होता. अणि या वर्षी ८ नोव्हेंबरलाच कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे अदेश देण्याचा योगायोग जुळून आला आहे . शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्ररणी बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे.

Exit mobile version