मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदेंचा बहिणींशी संवाद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना असून ही लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा काल (१७ ऑगस्ट) पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. या कार्यक्रमातही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना बंद होणार नसल्याचे सांगून विरोधकांवर हल्ला चढवला होता. मुख्यंमत्री शिंदेनी आज पुन्हा पुनरुच्चार करून योजना सुरु राहणार असल्याचे सांगितले. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागातून महिला मोठ्या प्रमाणावर सैनिक स्कूलच्या मैदानाच्या दिशेने येत होत्या. यावेळी जवळपास ५० हजारांच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आपल्या बहिणींशी मुख्यमंत्री संवाद साधत त्यांनी तुमच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का?, या पैशाचा उपयोग कसा करणार आहात? असे प्रश्न विचारत मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्स्फूर्त संवाद साधला. यावर अनेक महिलांनी शिलाई मशिन घेणार आहोत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरणार आहोत. आमच्या मुलांना शिकवून मोठे करणार आहोत, असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीणींना दिली.

हे ही वाचा :

एआयएमपीएलबी: सेक्युलर सिव्हिल कोड मुस्लिमांना मान्य नाही!

त्रिपुरामध्ये १६ बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना अटक !

कोलकाता: आरजी कार हॉस्पिटल परिसरात ‘कलम १६३’ लागू !

बांग्लादेशात हिंदूंच्या नोकऱ्यांवर डोळा, घरे-मंदिरावरील हल्ल्यानंतर जबरदस्तीने मागताहेत राजीनामे !

 

महिला जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे ते चांगले कळते. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील. राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदेनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढत जावून टप्या-टप्यापर्यंत ३ हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version