पश्चिम बंगालचे नाव बदला…ममता बॅनर्जी यांची मागणी!

केंद्र सरकारला लिहिले पत्र

पश्चिम बंगालचे नाव बदला…ममता बॅनर्जी यांची मागणी!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे नाव बदलण्याची पुन्हा मागणी केली आहे.बॉम्बेचे नाव मुंबई आणि ओरिसाचे नाव ओडिशा ठेवता येत असले तर आमची चूक काय?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.पश्चिम बंगालचे नाव बदलून “बांगला” करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी नवे नाव सुचवले असून पश्चिम बंगालचे नाव बदलून “बांगला” करावे असे म्हटले आहे.यासंदर्भात आम्ही विधानसभेत ठराव मंजूर केला होता.मात्र बराच वेळ मागणी करूनही आमच्या राज्याचे नाव बांगला ठेवण्यात आले नसल्याचे ममता यांनी सांगितले.राज्याच्या नाव बदलण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सर्वाधिक मौल्यवान कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ऍप्पलवर मात!

‘डीपफेक’प्रकरणी येत्या सात ते दहा दिवसांत आयटी नियमांत सुधारणा!

दक्षिण आफ्रिकेचा इस्रायलवर नरसंहाराचा आरोप!

रेड सीमधील हुतींच्या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिका- ब्रिटनचा एअरस्ट्राईक

नाव बदलण्याचे फायदेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील, पश्चिम हा शब्द काढून टाकला तर वर्णक्रमानुसार आपण थोडे पुढे येऊ शकतो.याचा फायदा संपदेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमच्या राज्याचे नाव बांगला असेल तर आमच्या मुलांना मदत मिळेल. आमच्या बैठकांमध्ये आम्हाला शेवटपर्यत थांबावे लागते, असे ममता म्हणाल्या.आता पूर्व बंगाल भारतात असल्याने पश्चिमेची गरज नाही.आता एकच बंगाल आहे.आपलं त्याला बंगाली म्हणायला हवे,असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, याआधी २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थाप झाले तेव्हा त्यांनी राज्याचे नाव बदलून पश्चिम बंग किंवा पश्चिम बांगो करण्याची मागणी केली होती.त्यानंतर ५ वर्षणानंतर ममता सरकारने एक ठराव केला, ज्यामध्ये बांगो किंवा बांगला हे नाव ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.

Exit mobile version