मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’अजित दादा तुम्ही एक दिवस जरूर मुख्यमंत्री व्हा’

विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांवर प्रत्युत्तर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’अजित दादा तुम्ही एक दिवस जरूर मुख्यमंत्री व्हा’

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या  ईव्हीएमवरील आरोपावर त्यांनी चोख प्रत्युतर दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेने विश्वास ठेवून महायुतीला मतदान केल्यामुळे घवघवीत यश मिळाले, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, महायुतीमधील सहकारी आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वेगवेगळ्या घटक पक्षांमुळे विजय प्राप्त झाल्याचे म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना ‘पर्मनंट उपमुख्यमंत्री’ म्हणत विरोधकांकडून टोला लगावला जात होता. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ‘अजितदादा तुम्हाला लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरुर एक दिवस मुख्यमंत्री व्हा’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका; आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनेचं!

एकनाथ शिंदेंचे नमस्ते सदा वत्सले… घरगड्याला वांत्या..

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले जाईल!

नोकरीच्या नावाखाली पाकिस्तानात अडकलेल्या हमीदा बानो २२ वर्षानंतर भारतात परतल्या!

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नारा दिला, ‘एक है तो सेफ है’. समाज एकसंघ राहिला तर आपण पुढे जाऊ शकू, हा नारा त्यांनी दिला. याला महाराष्ट्राने प्रतिसाद दिला आणि त्यातून महायुतीचा मोठा विजय झाला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

Exit mobile version