दिल्ली येथे पार पडणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या कार्यालयाचे उद्घाटन आज (३० जानेवारी) महाराष्ट्र सदन येथे करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. दरम्यान, २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी साहित्य संमेलन पार पडणार आहे. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, जगभरातील मराठी माणसांकरिता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे कि देशाच्या राजधानीमध्ये भव्य स्वरुपात साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन यशस्वी होण्याकरिता ७० लोकांची टीम दिवस रात्र काम करत आहे. मुरलीधर मोहोळ कार्यवाहक म्हणून त्यांना मदत करत आहेत.
हे ही वाचा :
बसपा नेते रज्जुमाजरा हत्याकांडातील आरोपी चकमकीत ठार!
अमेरिकेत प्रवासी विमानाची लष्करी हेलिकॉप्टरला धडक, १८ जणांचा मृत्यू!
कोर्टाने निर्णय दिलाय आता तरी भोंगे उतरवा!
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारे दिल्लीतील साहित्य संमेलन हे यशस्वी झाले पाहिजे या दृष्टीने आम्ही सर्व टीमच्या पाठीशी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील साहित्य संमेलनात येण्याकरिता होकार दिला आहे. विशेष म्हणजे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले साहित्य संमेलन आहे. त्यामुळे मराठी जनतेमध्ये खूप उत्सुकता आहे आणि विचार प्रवर्तनाचे काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दिल्लीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिल्लीमध्ये परिवर्तन होणार आहे, तसे दिसत आहे, लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे. १० वर्षांमध्ये जे अपेक्षित होते ते काही झालेले नाही, हे लोकांना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीकर सातत्याने लोकसभेत मोदींना निवडतात, यावेळी विधानसभेवर मोदींचाच झेंडा लागावा अशी अपेक्षा लोकांची दिसत आहे.