बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय!

बाळासाहेब होते तेव्हा दिल्लीतले नेते मातोश्रीवर येत होते मात्र आज उलटं झालंय, दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय, बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आली, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. आज (१४ नोव्हेंबर) पार पडलेल्या छत्रपती संभाजी नगर येथे महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार अहंकारी होते. महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणे हा कमीपणा नाही. राज्याला विकासासाठी निधी मिळवण्यासाठी आम्ही जातो पण ते मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा, यासाठी दिल्लीत जातात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी उबाठाला लगावला.

महायुतीच्या योजनांवर बोटं मोडली आणि त्या योजना चोरून थापासुत्री आणली, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्यावर केली. काँग्रेस आघाडी खोटे बोलणाऱ्यांचे दुकान असून त्याच्या गल्ल्यावर उबाठा बसले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला गिऱ्हाईक बनवण्याचा त्यांचा डाव आहे पण इथली जनता सुज्ञ आहे येत्या २० तारखेला महाआघाडीच्या दुकानाचे शटर कायमचे बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला.

हे ही वाचा : 

काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेसाठी विकासावर नाही तर विभाजनावर अवलंबून

मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक

झारखंडमध्ये काँग्रेस घुसखोरांनाही देणार गॅस!

भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!

अडीच वर्षात त्यांनी घरात बसून फेसबुकने लाईव्ह करुन सरकार चालवले. खंडणीच्या आरोपाखाली गृहमंत्री जेलमध्ये गेले. सगळे बडे प्रकल्प बंद केले. कामात स्पीडब्रेकर घालून जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटरग्रीड, मेट्रो असे अनेक प्रकल्प बंद होते. मंदिरे बंद होती तर भ्रष्टाचाराची दुकाने राजरोस सुरु होती. आम्ही ती सत्ता उलथवून टाकली आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले आणि मोदींच्या आशिर्वादाचे सरकार आणले, असे ते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्याला मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले पण इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. मराठवाड्यावर लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा निर्धार आपल्या सरकारने केलाय. महाविकास आघाडीने बंद केलेला मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नदीजोड प्रकल्प आपण सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे इथल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

Exit mobile version