मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाव न घेता टीका

मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज(११ मार्च) मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन करण्यात आले आहे.कोस्टल रोड उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसीचे अभिनंदन केले आणि नाव न घेता विरोधकांवर टीका केली.आधीच्या सरकारने फक्त खोडा घालण्याचे काम केलं.आज काही जण म्हणतात,मी इकडे उभा आहे तिकडे उभा आहे, हा वरळीतील विषय होता, अरे ज्यांनी निवडून दिलं, त्यांना तरी न्याय द्या, कोळी बांधवांना न्याय देऊ शकला नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, काही लोक म्हटतात, मी इकडे उभा राहतो मी तिकडे उभा राहतो.मतदार संघ नवीन शोधतो पण मी एकच सांगतो, जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तरी न्याय द्या.हा वरळीतील विषय होता, येथील कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत.या ठिकाणचे रखडलेले प्रकल्प आहेत, धोकादायक इमारती आहेत त्यांना आपण न्याय दिला पाहिजे.आपल्या आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांचं एकच काम असत ते म्हणजे सर्व सामान्यांना न्याय देणं, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, प्रियदर्शिनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या ३०० एकर जागेत आबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून मुंबईकरांसाठी हे ऑक्सीजन पार्क ठरणार आहे.हा मोठा प्रकल्प आहे आणि त्यासाठी काही लोकांनी काड्या घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्या सर्व बाजूला सारल्या, आता संपूर्ण प्रकल्पाला चालना मिळत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा..

“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”

निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारी देण्याचे एसबीआयला निर्देश

ऑस्कर अवॉर्ड २०२४: ओपेनहाइमर ठरला सर्वोत्कृष्ठ चित्रपट!

हरियाणा: रेवाडीमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!

 

प्रकल्पाची माहिती सांगताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासन सर्वसामान्यांना लाभ होणारे प्रकल्प वेगाने पूर्ण करीत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या किनारी रस्त्यामधील एका मार्गिकेचा आज शुभारंभ होत असून पुढील टप्पा मे महिन्यापर्यंत सुरू होईल. वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्यामध्ये सहाय्यभूत ठरणाऱ्या या प्रकल्पात सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. उपलब्ध मोकळ्या जागेत हरीत क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.

मुंबईचे भूमिपूत्र असलेल्या कोळी बांधवांच्या मागणीनुसार या रस्त्यांच्या खांबांमधील अंतर १२० मीटरपर्यंत वाढवून त्यांना न्याय दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा रस्ता पुढे टप्प्याटप्प्याने दहिसर आणि पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गेमचेंजर ठरणारा अटल सेतू, किनारी मार्ग यांसह इतर प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईत कोठेही एका तासात पोहोचता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सिद्धीविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येईल, यासाठी महापालिकेमार्फत ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगून मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या गृह प्रकल्पांमुळे बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाजवळ उचित ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
प्रियदर्शिनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या ३०० एकर जागेत आबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून मुंबईकरांसाठी हे ऑक्सीजन पार्क ठरणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version