29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला, केली रुग्णाला मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला, केली रुग्णाला मदत

आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधून ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचे दिले निर्देश

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.

यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे त्याना समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्याने त्याला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

हे ही वाचा:

बांग्लादेशी मुलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्याची ‘घरवापसी’

प्रदीप कुरुलकर त्या पाक एजंटकडे आकर्षित झाले आणि खूप काही सांगून बसले!

कर्नाटक विधानसभेत बजेट सत्र सुरू असतानाच एक माणूस घुसला

‘आदिपुरुष’ प्रकरणी मनोज मुंतशीरकडून जाहीर माफी!

अखेर क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.

मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेने मदत केलेली पाहुन सोनवणे यांच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानिमित्ताने त्यांच्या संवेदनशील स्वभाव पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा