मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रसंगावधान; मुलीचे वाचवले प्राण!

मुलीला उपचारासाठी एअरलिफ्ट करून तिला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात केले दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रसंगावधान; मुलीचे वाचवले प्राण!

मंगळवारी मराठा आरक्षणाचे विधिमंडळ बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सरकार व्यस्त होते. या सर्व धावपळीत छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळकरी मुलीचा दुसऱ्या मजल्यावरून पडून अपघात झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक सूचना त्यांच्या वैद्यकीय पथकाला दिल्या.

अधिवेशातील व्यस्त कार्यक्रमात असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा फोनवरून त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधून मुलीच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचसोबत मुलीच्या उपचारात कोणतीही हयगय नको, योग्य ती खबरदारी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. दुसऱ्या मजल्यावरून पडून या मुलीचा अपघात झाल्याने तिला उपाचारासाठी एअरलिफ्ट करण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मुलीला उपचारासाठी एअरलिफ्ट करून तिला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

 हेही वाचा :

पुणे पोलिसांकडून ४ हजार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

सिद्धू, युवराजसिंग भाजपच्या ‘टीम’मध्ये?

आदिवासीच्या ‘खबरी’मुळे गडचिरोली पोलिसांना कूकर बॉम्ब शोधण्यात यश

फातिमा झाली कविता, अब्दुल्ला झाला शिवप्रसाद

दोन दिवसापूर्वी घराच्या दुसऱ्या मजल्यावरून ही १६ वर्षीय मुली कोसळली होती. तिला त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला पुढील अत्यावश्यक उपचारांची गरज होती. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळवली. त्यानंतर तातडीने याचे गांभीर्य ओळखून तातडीने या मुलीला उपचारासाठी एअरलिफ्ट करून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Exit mobile version