मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली. रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी रटन टाटा यांची त्यांच्या कुलाब्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि रतन टाटा यांच्यामध्ये ४५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आज त्यांची भेट घेतली. रतन टाटा यांची तब्येत आता उत्तम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच रतन टाटा यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
हे ही वाचा:
सोनिया गांधींसाठी काॅंग्रेस कार्यकर्ते ट्रॅकवर उतरले; बाेरिवलीत राेखली साैराष्ट्र एक्सप्रेस
वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार
सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना देण्यात येणाऱ्या स्थगितीबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही विकास कामांना स्थगिती देण्यात येत नाहीये, फक्त जे निर्णय घाई गडबडीने घेण्यात आले आहेत, त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांची काहीही तक्रार नाही, त्यांच्यासोबत बैठक झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.