काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

प्रकृती ठीक नसल्याने उपचार सुरू

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता लवकरच नवे सरकार स्थापन होणार आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अजूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव गुलदस्त्यात असून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले काही दिवस आजारी होते. यासाठी ते विश्रांतीसाठी म्हणून सातारा येथील त्यांच्या गावीही गेले होते. दोन दिवसांनी ते ठाण्यात परतले पण आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. त्यांना आता पुढील उपचारांसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांना तापही येत असून अशक्तपणा आहे. घशातही इन्फेक्शन असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या. डॉक्टरांनी त्यांना थेट रुग्णालयातच दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शिंदे रुग्णालयात दाखल झाले आहेत. ज्युपिटर रुग्णालयात शिंदेंवर उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

चिन्मय कृष्णा दास यांच्या बाजूने लढणाऱ्या बांगलादेशी वकिलावर बांगलादेशात हल्ला

मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: नामको बँकेच्या व्यवस्थापकासह सहव्यवस्थापकाला अटक

एकनाथ शिंदेंशी कोणतेही मतमतांतर नाही…आमचा शपथविधी दिमाखदार होईल

अजित पवार महायुतीत नसते तर?

“शिंदेंची प्रकृती बरी नाही. त्यांना घशाचा संसर्ग झाला आहे, कफ झाला आहे. त्यांना थोडा ताप आहे. आम्ही दिल्लीत गेलो होतो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर होतो. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला त्यांना दिलाय. मुख्यमंत्री झाल्यापासून सव्वादोन वर्ष सातत्याने त्यांनी काम केलं आहे. शेवटी ती एक व्यक्ती आहे. इतका ताण शरीरावर दिल्यानंतर प्रकृती खराब होणं साहजिक आहे,” असं शंभूराज देसाई म्हणाले.

Exit mobile version