मोदींची तुलना औरंगजेबाशी हा तर देशद्रोह!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला घणाघात

मोदींची तुलना औरंगजेबाशी हा तर देशद्रोह!

पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी करणे हा देशाचा अपमान, देशद्रोह आहे.केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणे म्हणजे मर्दुमकी न्हवे.वेळे प्रसंगी शेपूट घालणाऱ्या, दिल्लीला जाणाऱ्या, लोटांगण घालणाऱ्यांना अन जेव्हा नोटीस येते तेव्हा घामाघूम होणाऱ्यांना आम्ही चांगलंच ओळखतो.याकूब मेमनची कबर सजवणं हे कोणतं देशप्रेम, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, लोकसभेच्या निवणुकीमध्ये महाराष्ट्रामधील ४८ जागांपैकी ४५ हुन अधिक जागेवर विजय मिळविण्यासाठी आज आढावा बैठक घेण्यात आली.प्रत्येक मतदार संघातले निरीक्षक, पदाधिकारी, प्रवक्ते, नेते, आमदार खासदार यांच्यामध्ये आज चर्चा झाली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींची औरंगजेबाशी तुलना करणे हे दुर्दैव आहे.देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी या देशाला एक नवा आयाम,नवी उंची दिली. बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिर बांधण्याचे स्वप्न, ३७० कलम हटवण्याचे हे काम पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं.पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी करणे म्हणजे देशाचा अपमान, देशद्रोह आहे.

तुलना करणाऱ्यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे.औरंगजेबाने आपल्या वडिलांना, भावाला, नातेवाईकांना कधीही सोडलं नाही, अन यांनी सुद्धा तशीच वृत्ती दाखवली.यांच्याकडून दुसरीकोणतीही अपेक्षा ठेवता येत नाही.मात्र, येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनता याला चांगलच उत्तर देईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार

केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला

केजरीवाल यांना वाटू लागली अटकेची भीती!

ब्रेन चीप यंत्राचा वापर करून अर्धांगवायू झालेल्या रुग्णाने बुद्धिबळ खळले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा हे देशाचे कणखर आणि धाडसी व्यक्ती आहेत.पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देशातील अनेक महत्वपूर्ण कामे पार पाडली.त्यांच्यावर टीका करणे म्हणजे मर्दुमकी नाही.याकूब मेमनची कबर सजवणं हे कोणतं देशप्रेम आहे.

एक फोटो ग्राफर आहेत. त्यांना शेपटी असणाऱ्या प्राण्यांवर जास्त परिचय आणि प्रेम झालेले आहे.वेळ प्रसंगी हे शेपूट घालणारे, दिल्लीमध्ये जाणारे, दिल्लीला लोटांगण घालणारे अन जेव्हा यांना नोटीस येते तेव्हा घामाघूम होणारे, हे लोक आहेत.सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार सोडून यांनी शेपूट घातले.

इंडी आघाडीमध्ये असलेल्यांमध्ये एकी नाहीये.बाळासाहेबांनी देशाला ज्या ठिकाणावरून मार्गदर्शन केलं, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ज्यांनी अपमान केला त्यांना या शिवतीर्थावर उभं केलं.तो दिवस काळा दिवस होता.इंडी आघाडी पूर्णपणे तुटलेली आहे.आगामी निवडणुकीमध्ये या लोकांना मतदार घरी बसवेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Exit mobile version