मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विधान भवनात योग दिवस केला साजरा

विधान भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नेत्यांची उपस्थिती

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विधान भवनात योग दिवस केला साजरा

भारतासह जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर जगभरात योग दिन साजरा केला जात. जगभरात योग साधनेचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी योग दिन साजरा व्हावा, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या कार्यकाळातचं संयुक्त राष्ट्रांकडे पाठविला होता. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता देत २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारतासह जगभरात योगासनांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. करोनाचे सावट दूर होताच यंदा पुन्हा दोन वर्षांनी नव्या उत्साहात मुंबईसह महाराष्ट्रातही योगा दिन साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी काही योगासनेही केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

विधान भवनात आयोजित केलेल्या या योग दिनाच्या कार्यक्रमाला नागरिक आणि विद्यार्थीही उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपाल रमेश बैस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद विरोधी अध्यक्ष अंबादास दानवे आदी नेते उपस्थित होते.

हे ही वाचा:

लष्कर ए तोयबाच्या साजीद मीरला काळ्या यादीत टाकण्यासाठी कुरापती चीनचा नकार

‘गद्दार दिना’शी राष्ट्रवादीचा काय संबंध?

अमेरिका दौऱ्याला निघताना पंतप्रधानांनी चीनला सुनावले

रोहितचा उत्तराधिकारी म्हणून कुणालाही तयार केले नाही!

मुंबईतील मैदाने, गार्डन आणि बीचवरही योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मुंबईकरांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बांद्रा येथील गार्डनमध्ये भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी योगा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version