मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विक्रम गोखले यांना वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाने श्री विक्रम गोखले ह्यांना ट्विटर द्वारे श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विक्रम गोखले यांना वाहिली श्रद्धांजली

शनिवारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले.या बातमीने देशातील सर्व नागरिक दुखावले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यासह अनेक दिग्गजांनी विक्रम गोखले यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

 

विक्रम गोखले यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जातं आहे. प्रसिद्ध कलाकारांनी गोखलेंना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. यामध्ये अक्षय कुमार, रवीना टंडन, अनुपम खेर, अशोक पंडित, संजय गुप्ता इत्यादी कलाकारांनी त्यांची भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या.

 

 

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

ज्येष्ठ चित्रपट, दूरचित्रवाणी आणि रंगमंच अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी पुणे शहरातील एका रुग्णालयात निधन झाले. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गोखले (७७) यांना या महिन्याच्या सुरुवातीला प्रकृतीच्या गंभीर कारणास्तव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे पार्थिव शहरातील बालगंधर्व सभागृहात ठेवण्यात येणार असून सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विक्रम गोखले हे मराठी थिएटर आणि सिनेसृष्टीतील तसेच हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अग्निपथ (१९९०), हम दिल दे चुके सनम (१९९९), भूल भुलैया (२००७), नटसम्राट (२०१५), हिचकी (२०१८), आणि मिशन मंगल (२०१९) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

Exit mobile version