25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषसरन्यायाधीश लळीतांना आजोबा, वडिलांकडून मिळाला वकिलीचा वारसा

सरन्यायाधीश लळीतांना आजोबा, वडिलांकडून मिळाला वकिलीचा वारसा

सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे ६वे ज्येष्ठ वकील

Google News Follow

Related

राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश उदय उमेश लळीत यांना शपथ दिली लळीत हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम सुरू केले. न्यायमूर्ती लळीत हे सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे ६वे ज्येष्ठ वकील आहेत. सरन्यायाधीशाची शपथ घेतल्यानंतर उदय लळीत यांनी आपले वडिल आणि आजाेबा यांचे आशिर्वाद घेतले.

उदय लळीत यांचे मूळ गाव गिर्ये विजयदुर्ग असले तरी हे कुंटुब नंतर रायगड जिल्हयातील आपटे (रोहा) येथे गेले. वकिली घराण्यात पिढीजात चालत आलेली आहे. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपट्याहून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले. त्यांची आजी त्या काळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक एलसीपीएस डॉक्टर होत्या. उदय लळीत यांचे वडील अॕड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते १९७४ ते ७६ या काळात उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत शिक्षण पूर्ण करून उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले व तब्बल सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केले.

हे ही वाचा:

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

वकिली नैपुण्याची पोचपावती

“सुमारे १.७० लाख कोटी रुपयांच्या २-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित अभियोग चालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये विशेष अधिकार वापरून ज्येष्ठ वकील उदय उमेश लळीत यांची विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली, ही महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबईच्या वकिली नैपुण्याची आणखी एक चोख पोचपावती म्हणावी लागेल.

अनेक खटल्यात वकिली कौशल्याचा ठसा

लळीत यांनी देशभर असंख्य महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकिली कौशल्याचा ठसा उमटवला आहे. देशभरातील बहुतांश उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी जाऊन अभ्यासपूर्ण युक्तिवाद केलेले आहेत. गेली सात वर्षे ते महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात पॅनेलवरील ज्येष्ठ वकील आहेत. आजवर त्यांनी देशातील सुमारे १४ राज्य सरकारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे चालविली आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा