मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.आयबीच्या माहितीच्या आधारे गृह मंत्रालयाने हे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. काही काळांपासून विरोधी पक्षांनीही निवडणूक आयोग सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला आहे.विरोधी पक्षांवर कारवाई केली जात आहे, भाजप नेत्यांवर कारवाई होत नाही, असे विरोधक वारंवार आरोप करत आहेत.दरम्यान, आयबीने दिलेल्या थ्रेट परसेप्शन रिपोर्टनंतर गृह मंत्रालयाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा प्रदान केली आहे.
तृणमूलसह अन्य विरोधी पक्षांकडून निवडणुकीत अशांतता असल्याचे पाहून आयबीने थ्रेट परसेप्शन रिपोर्ट दिला होता.यावरूनच गृह मंत्रालयाकडून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.झेड सुरक्षेमध्ये एकूण ३३ सुरक्षागार्ड तैनात असतात. आर्म्ड फोर्सचे १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड व्हीआयपीच्या घरी तैनात असतात. सहा राऊंड द क्लॉक पीएसओ, तीन शिफ्टमध्ये बारा आर्म्ड स्कॉर्ट कमांडे, दोन वॉचर्स आणि तीन ड्रायव्हर तैनात असतात.
हे ही वाचा:
‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’
सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!
‘सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मणिपूरची परिस्थिती सुधारली’
एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!
दरम्यान, देशाय सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. याची सुरुवात १९ एप्रिलपासून होणार आहे. दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातवा टप्पा १ जून रोजी संपन्न होणार आहे.सर्व टप्प्यातील एकत्रित मतमोजणी ४ जून रोजी पार पडणार आहे.