मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट बुधवारी (२६ मार्च) संसद भवन ग्रंथालय इमारतीतील बालयोगी सभागृहात दाखवला जाणार आहे. या विशेष स्क्रिनिंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि खासदार देखील उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसह चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स स्क्रिनिंगला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधानांनी सुमारे महिनाभरापूर्वी ‘छावा’ चित्रपटाचे कौतुक केले होते. २१ फेब्रुवारी रोजी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेले आहे. आजकाल, छावा देशभरात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह संसदेत ‘द साबरमती रिपोर्ट’च्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. त्यानंतर आता ‘छावा’ चित्रपटाला हजेरी लावणार आहेत.
हे ही वाचा :
सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घराचे मोजमाप सुरू, बुलडोझर चालणार?
हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची खाज…
प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक!
२०४७ पर्यंत सपा, काँग्रेस, बहुजन समाज पक्षाचे कोणतेही भविष्य राहणार नाही
या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून ‘छावा’ चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. रविवारी आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील मोठा सामना असूनही, सहाव्या आठवड्यातही लोक विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. ‘छावा’ चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन ५८३.३५ कोटी रुपये इतके पोहचले आहे. तर जगभरात ७८० कोटी रुपयांची कमाई केली आहे.