छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, अंतागडच्या हुर्तराईच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली.
आज तकच्या बातमीनुसार, पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला म्हणाले की, छत्तीसगडमधील कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत आणि दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.पोलीस आणि डीआरजी टीमने वेगवेगळ्या भागात शोधमोहीम राबवली होती.कोयालीबेराच्या दक्षिण भागात झाली.तसेच पोलीस आणि जवानांकडून जंगलात अजूनही शोध मोहीम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
महिनाभरात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने, चांदीचे दागिने अर्पण
पुढील तीन महिने ‘मन की बात’ ला सुट्टी
राष्ट्रध्वजाला म्हटले ‘सैतानी’; फ्रान्सने केले मुस्लिम धर्मगुरूला हद्दपार
अशोक चव्हाण कामाला लागले; तब्बल ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!
दरम्यान, गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडमधील बलरामपूर, बस्तर, बिजापूर, दंतेवाडा, धमतरी, गरिआबंद, कांकेर, कोंडागाव, महासमुंद, नारायणपूर, राजनांदगाव, सुकमा, कबीरधाम आणि मुंगेली हे १४ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत.आकडेवारीनुसार, राज्यात दरवर्षी सरासरी साडेतीनशेहून अधिक नक्षलवादी हल्ले होतात.या हल्ल्यात दरवर्षी सरासरी शहीद जवानांची संख्या ४५ इतकी आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये गृह मंत्रालयाने छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यांची आकडेवारी सादर केली होती.त्यानुसार २०२२ मध्ये राज्यात ३०५ नक्षलवादी हल्ले झाले होते.आकडेवारीनुसार २०१३ ते २०२२ या १० वर्षांत छत्तीसगडमध्ये ३ हजार ४४७ नक्षलवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये ४१८ जवान शहीद झाले आहेत तर सुरक्षा दलांकडून ६६३ नक्षलवादी ठार झाले आहेत.