छत्तीसगड: सशस्त्र दलाच्या जवानाची नक्षलवाद्यांकडून हत्या!

गस्त घालत असताना जवानावर कुऱ्हाडीने केला वार

छत्तीसगड: सशस्त्र दलाच्या जवानाची नक्षलवाद्यांकडून हत्या!

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.विजापूर जिल्ह्यातील ग्रामीण बाजारपेठेत गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान हुतात्मा झाला आहे.नक्षलवाद्यांनी सीएएफ जवानाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.शनिवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुत्रु पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात सकाळी ९.३० च्या सुमारास बाजारपेठेत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीएएफ पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला.नक्षलवाद्यांच्या एका लहान गटाने हा हल्ला केला होता.नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात सीएएफ टीमचे नेतृत्व करणारे कंपनी कमांडर तिजाऊ राम भुर्या यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

राजस्थानमध्ये हिजाबवरून पुन्हा वातावरण तापले!

काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण

नव्या जोशात काम करा, पुढचे १०० दिवस महत्त्वाचे!

योगी आदित्यनाथ लोकप्रियतेत दुसऱ्या स्थानावर!

ते पुढे म्हणाले की, नक्षलवाद्यांनी जवान तिजाऊ राम भुर्या यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून घटनास्थळावरून पळ काढला.या हल्ल्यात जवानाचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. हुतात्मा जवान तिजाऊ राम भुर्या हे सीएएफच्या चौथ्या बटालियनमध्ये तैनात होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध सुरू केला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, गेल्या महिन्यात सुकमा भागातील टेकलगुडेम गावाजवळ नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता.सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक शोध मोहिमेवर असताना नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता.नक्षलवाद्यांच्या या हल्लयात सीआरपीएफचे तीन जवान हुतात्मा झाले, तर १४ जवान जखमी झाले होते.

Exit mobile version