31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषशिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना खूप शुभेच्छा

Google News Follow

Related

आपल्या देशाचा विचार करताना मराठा साम्राज्याचा आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत च नाही.मराठा साम्राज्य छत्रपतींनी उभे केले. छत्रपती शिवाजी अत्यंत शूर , धाडसी,पराक्रमी होते. ते धर्मनिष्ठ असून , अजून अनेक पिढ्या त्यांच्या कार्याच्या गौरवाने प्रेरित होणाऱ्या आहेत. छत्रपतींनी आपले संपूर्ण जीवनच मानवता जपण्यासाठी आणि मराठा साम्राज्य अर्थात स्वराज्यसाठी समर्पित केले. छत्रपती असे शूर योद्धा होते कि मुघल शासकांच्या अत्याचारातून त्यांनी आपल्या देशाची सुटका केली. या थोर सेनानी मुले आपल्या देशाचे नाव पूर्ण जगात खूपच आदराने घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, कर्तृत्व इतके महान होते कि ‘पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ असे महान व्यक्तिमत्व होते. वीजापूरचा सुलतान आणि मुघल साम्राज्याचा शासक आदिलशाह याच्या सांगण्यावरून औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दक्षिण भारतात छत्रपतींच्या विरुद्ध लढण्यासाठी नियुक्त केले होते. पण महाराजांनी त्याची बोटे छाटून त्याला परत पाठवून दिले. छत्रपतींच्या अनेक कथा , त्यांची धोरणे आपल्याला रोजच्या जीवनात सुद्धा खूप उपयुक्त आहेत. उत्तम व्यवस्थापन, सगळ्यांना एकत्र करून उत्तम कामगिरी करण्याची हातोटी ,कुशल प्रशासक , शिस्तबद्ध लश्करी,    त्यांची गनिमी काव्याची पद्धत तर त्यात ते माहीरच होते. त्यामुळे त्यांनी उत्तम प्रकारे राज्य नव्हे स्वराज्य स्थापन करून ते चालवून दाखवले. खूप लहान वयांत त्यांनी कुशल कामगिरी केली आहे. ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ अशीच छत्रपतींची ओळख आजपण म्हणता येईल. छत्रपती फक्त शिवजयंती पुरते लक्षात न ठेवता,रोजच्या जीवनात त्यांच्या कार्य आपल्यला स्फूर्ती देत राहील. १६७४ मध्ये त्यांचे सर्वाच्या सर्व २३ किल्ले मुघलांशी लढून जिंकून घेतले. पुरंदरच्या तहानुसार त्यांना द्याव्या लागलेल्या सर्व जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर गेले होते तेव्हा, आपलय काही सहकाऱयांबरोबर आणि संभाजी महाराजांना घेऊन मिठाई च्या पेटीतून महाराज सहज बादशहाला तुरी देऊन निसटले आणि बादशाह हात चोळत बसला होता. हे ही वाचा: प्रियकराचे वैफल्य आईच्या जीवावर तो आत्महत्या करणार होता,पण पोलिसांनी त्याला वाचवले! गिरीश बापटांबद्दल राष्ट्रवादीला चिंता का? नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ त्यांच्या प्रत्येक कथा ह्या फक्त लहानांसाठी नसून सर्वच वयोगटातील लोकांसाठी खूपच उद्देशपूर्ण असतात. समाजातील प्रत्येक घटकांचा लहान थोर असा किंवा हा गरीब हा श्रीमंत असा भेदभाव करत नव्हते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन त्यांनी स्वतःचे मराठा साम्राज्य उभे केले. ते उत्तम प्रशासक , संघटक होते अनेक उत्तम योजना जनतेसाठी राबवून त्यांनी आपण कुशल प्रशासक आहोत हे दाखवून दिले आज शिवजयंतीच्या  निमित्ताने   छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींच्या मातोश्री जिजाबाई यांना शतशः नमन. जय शिवाजी जय जिजाऊ

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा